ग्लोबल वार्मिंगवरती उपाययोजना करून त्याची तीव्रता जर कमी नाही केली तर पृथ्वीचा विनाश हा अटळ आहे. त्यामुळे हे संकट कमी करण्याची पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारीच नव्हे तर कर्त्यव्य आहे. ग्लोबल वार्मिंग वाढण्यामध्ये जसा प्रत्येकाचा वाटा आहे तसाच तो कमी करण्यासाठीही प्रत्येकाने हातभार हा लावलाच पाहिजे. वैद्यानिकांच्या आणि पर्यावरणवादींच्या मते ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाटी मुखत्वे क्लोरोफ्लोरो कार्बोनचे उत्सर्जन कमी करावे लागेल आणि त्यासाटी फ्रीज, एअर कंडीशनर आणि कुलिंगसाठी वापरल्या जाणार्या यंत्रांचा वापर कमी करावा लागेल ज्यातून हा वायू बाहेर पडतो.
सध्या आपण सगळेच वाढत्या उन्हामुळे त्रस्त झालो आहोत, वरचेवर उन्हाळा आणखीनच असह्य होत चालला आहे. मागच्या काही वर्षापासून उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता वाढतच आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती, शेतकर्यांना करावे लागणारे स्थलांतरण, जनावरांची असहायता अशा गोष्टींमुळे उन्हाळ्याची भयानकता आणखीनच वाढत आहे त्याचबरोबर पावसाळ्यातील पावसाचे सातत्य ही कमी होत चालले आहे ज्यामुळे कधी अतिवृष्टी होते तर कधी अल्पवृष्टी या सगळ्या बदलांमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चलला आहे आणि या सर्वांसाठी आपणच जबाबदार आहोत कारण प्रत्येक उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात आपण तीच तीच चर्चा करतो आणि विसरून जातो. हे सगळे बदल क होतात? त्याची करणे काय आहेत? त्यावर उपाय काय आहेत हे माहिती करण्याचा आपण प्रयत्नच करत नाही. जर आपण तसा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल कि, एक भलंमोठं संकट आपल्या समोर उभं आहे. ज्याचं नाव आहे ग्लोबल वार्मिंग.
ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय?
पृथ्वीच्या वातावरणात उष्णता साचून किंवा अडकून राहण्याची प्रक्रिया म्हणजे
ग्रीन हॉउस ईफेकट. विशिष्ट प्रकारच्या गासेसमुळे ही प्रक्रिया घडते, सूर्यप्रकाश वातावरणात प्रवेश करतो, सूर्याकडून मिळणाऱ्या एकूण उर्जेपैकी एक तृतीयांश सौरुउर्जा वातावरणातून आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरून तत्काळ अवकाशात परत जाते, उर्वरित सौरऊर्जा पृथ्वीचा पृष्ठभाग शोषून घेतो आणि त्यामुळे संपूर्ण पृथ्वीला ऊब मिळते. पृथ्वी जेव्हा थंड होते तेव्हा ती शोषुन घेतालेली उष्णता वातावरण भेदून परत अवकाशात मिसळते. मात्र पृथ्वीची सर्वच उष्णता परत अवकाशात जात नाही वातावरणात उपस्थित असलेले कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्ल्रोरो कार्बन आणि पाण्याची वाफ हे सर्व घटक ही उष्णता अवकाशात जाण्यापासून रोखतात, त्यामुळे ही उष्णता पृथ्वीच्या वातावरणात अडकून पडते आणि परिणामी तापमान वाढते हेच आहे ‘ग्लोबल वार्मिंग’.
ग्लोबल वार्मिंगची कारणे?
वाढत्या श्हारीकरणामुळे वाढत चाललेली जंगलतोड, अधुनुकीकरणासाठी, विकासासाठी आणि ऐशोरामासाठी होणारा उर्जेचा अतीवापर या गोष्टी ग्लोबल वार्मिंगसाठी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ज्या वेगाने आपण उर्जेची निर्मिती करतोय त्यापेक्षा जास्त वेगाने आपण ती वापरतोय. कोळसा, नैसर्गिक वायू, कच्चे तेल यांची निर्मिती होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. उर्जेचे स्त्रोत हे मर्यादित आहेत आणखीन ४० वर्षे उर्जेची निर्मिती करता येईल एवढेच इंधन आता बाकी आहे आपण जे उर्जास्त्रोत वापरत आहोत त्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती शक्य नाही. मोठ्या प्रमाणावरील कोळसा व पेट्रोलचा वापर आणि त्याचवेळेस कमी झालेली जंगले यामुळे वातावरणातील
कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण अजून जोमाने वाढण्यास मदत झाली.
घन कचरा, लाकूड तेल, नैसर्गिक गॅस आणि कोळसा आदींच्या ज्वलनातून कार्बनडाय ऑक्साईडची निर्मिती होते. जैविक कचरा सडला कि त्यातून
मिथेन वायू बाहेर पडतो. मिथेन वायू कार्बनडाय ऑक्साईड पेक्षा २० पट घातक आहेऔद्योगिक वसाहतीमधील अनेक प्रक्रीयामधून हा वायू वातावरणात सोडला जातो. क्लोरोफ्लोरो कार्बन हा वायू शीतपेटी(फ्रीज), वातानुकूलन(
AC) इ. यंत्रांमधून बाहेर पडतो या वायुमुळे ओझोनचा थर विरळ होऊन साच्छिद्रता वाढण्याचा धोका आहे त्यामुळे सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर पोहचून मनुष्यास त्वचेचा कर्करोग तसेच जनुकीय बदल होतात आणि एकूण तापमानात वाढ होते
ग्लोबल वार्मिंगचे परिणाम
१९५८ सालापासून ते आजपर्यंत वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडच्या प्रमाणात जवळजवळ ६८ टक्क्यांनी वाढ झाली असून भविष्यकाळात त्यात अधिक वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे पृथ्वीचे तापमान ३-४० अंशाने वाढेल. शेतीवर अनिष्ठ परिणाम होऊन धान्य सामग्री आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या इतर अनेक आवश्यक उत्पादनात घट होईल.
ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून सागरजल पातळी वाढल्याने किनार्यांचा काही भाग, शेते जलमय होतील. मुंबई, चेन्नई, नुयोर्क, लंडन, टोकियो, फ्लोरिडा व कोलकत्ता या शहरांचा पुष्कळसा भाग समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची भीती आहे. एकीकडे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळत आहे तर दुसरीकडे वाळवंटे पसरत चालली आहे, पावसाला ही अनियमित होत चालला आहे, कधी ओला दुष्काळ पडतो तर कधी कोरडा दुष्काळ पडतो.
ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचे उपाय
वरील सर्व गोष्टींवरून ग्लोबल वार्मिंग हे आपल्यासमोरील किती मोठे संकट आहे हे लक्षात आलेच असेल, ग्लोबल वार्मिंगवरती उपाययोजना करून त्याची तीव्रता जर कमी नाही केली तर पृथ्वीचा विनाश हा अटळ आहे. त्यामुळे हे संकट कमी करण्याची पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारीच नव्हे तर कर्त्यव्य आहे. ग्लोबल वार्मिंग वाढण्यामध्ये जसा प्रत्येकाचा वाटा आहे तसाच तो कमी करण्यासाठीही प्रत्येकाने हातभार हा लावलाच पाहिजे. वैद्यानिकांच्या आणि पर्यावरणवादींच्या मते ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाटी मुखत्वे
क्लोरोफ्लोरो कार्बोनचे उत्सर्जन कमी करावे लागेल आणि त्यासाटी फ्रीज, एअर कंडीशनर आणि कुलिंगसाठी वापरल्या जाणार्या यंत्रांचा वापर कमी करावा लागेल ज्यातून हा वायू बाहेर पडतो.
औद्योगिक कारखान्यामधून बाहेर पडणारा धूर आणि वाहनामधून बाहेर पडणारा धूर कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढवण्यासाठी मुखत्वे जबाबदार आहे त्यामुळे त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कारखान्यांवरती कडक निर्बंध लावायला पाहिजे वाहनाच्या वापरावर आणि त्यातून बाहेर पडणार्या कार्बनडाय ऑक्साईडचवर मर्यादा घालून नियंत्रित करायला पाहिजे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे जंगलतोड थांबवून जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे झाडांची संख्या जर वाढली तरच या संकटाची तीव्रता कमी करता येईल.
वरील उपायांकडे बघून असे वाटेल कि ही तर विकसित राष्ट्रांची, गव्हर्मेंटची, सरकारची जबाबदारी आहे एकट्याने काय होणार? पण प्रत्येकाने जर ठरविले कि शितयंत्राचा वापर गरजेनुपुरताच करेन, वाहनांसाठी कार्बनडाय ऑक्साईडची जी मर्यादा घालून दिलीय त्याचे पालन करेन, वैयक्तिक वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा जास्त वापर करेन, उर्जेचा अपव्यय टाळून तिचा काटकसरीने वापर करेन, पारंपारिक (कोळशापासून जी वीजनिर्मिती होते) उर्जेचा वापर कमी करून अपारंपरिक उर्जेचा (सौरऊर्जा, पवनउर्जा, बयोगँस, जलविद्युत इ.) वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेन, वृक्षतोडीला विरोध करेन, जास्तीत जास्त झाडे लावून ते जागवण्याचा प्रयत्न करेन, तरच पृथ्वीला या संकटापासून वाचवता येईल आणि आणखीन समृद्ध बनवता येईल.