Translate

Tuesday, December 25, 2018

बदलती शिक्षण पद्धती आणि शिक्षक

             कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही  त्या राष्ट्राच्या शैक्षणिक दर्जावर अवलंबून असते आणि शिक्षणाचा दर्जा हा देशाच्या शिक्षकांवरून ठरतो त्यामुळे राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकाचे योगदान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे.
           आपल्याकडे असलेले ज्ञान  हे दुसऱ्या पर्यंत पोहचवणे हे आपले कर्तव्य आहे असे मानून निस्वार्थी भावनेने ज्ञान दानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा वारसा आपल्या देशाला लाभला आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता अोळखून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करुन, त्यांच्याकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करून घेणारे शिक्षक ही आपल्या समाजाने बघितले आहेत त्यामुळे शिक्षकांना समाजात मनाचे व आदराचे स्थान आहे. नेल्सन मंडेला म्हणतात शिक्षण हे एक असे प्रभावी शस्त्र आहे ज्याचा सुयोग्य वापर करून तुम्ही जग बदलू शकता, हे शस्त्र समाजाच्या देशाच्या उन्नतीसाठी उत्तमप्रकारे वापरण्याची योग्यता विद्यार्थ्यांनमध्ये फक्त एक  शिक्षकच निर्माण करू शकतो त्यामुळे शिक्षकाचा शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन हा अत्यंत महत्वपूर्ण ठरतो.
     पण जसं काळ बदलत गेला तसं शिक्षणाचं स्वरूप आणि शिक्षकांची विचारसरणीही बदलली आहे. सध्या गुणवत्तेपेक्षा जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. विषयांच्या मुळ संकल्पना समजुन न सांगता फक्त घोकंपट्टीवरच जास्त भर दिला गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य गुण विकसित होण्याचे प्रमाण ही कमी होत चालले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा दर्जा हा खालावत चालला आहे असे विद्यार्थी शिक्षण पुर्ण करुन पदवी तर मिळवतात पण चांगली नौकरि मिळवण्यात ते अपयशी ठरतात आणि याचा परिणाम बेरोजगारी वाढवण्यामध्ये होतो.
             नेल्सन मंडेला म्हणतात शिक्षण हे एक असे प्रभावी शस्त्र आहे ज्याचा सुयोग्य वापर करून तुम्ही जग बदलू शकता, हे शस्त्र समाजाच्या देशाच्या उन्नतीसाठी उत्तमप्रकारे वापरण्याची योग्यता विद्यार्थ्यांनमध्ये फक्त एक  शिक्षकच निर्माण करू शकतो त्यामुळे शिक्षकाचा शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन हा अत्यंत महत्वपूर्ण ठरतो. कुठेही नौकरी मिळत नाही, आरामाची नौकरी आहे म्हणून शिक्षक होणाऱ्यांचे प्रमाण ही वाढत चालले आहे आणि हि फार चिंतेची बाब आहे असे शिक्षक गुणवत्तापुर्ण विद्यार्थी कसे घडवू शकतील कारण त्यांच्या मध्येच गुणवत्तेचा अभाव आहे. हे चित्र जर बदलायचे असेल तर  सामाजाला आणि देशाला आणखीन समृद्ध करण्यासाठी, स्वयंप्रेरणेने आणि आवड म्हणुन शिक्षकी पेशा स्वीकारणार्यांची संख्या वाढली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत  स्वतःला आद्ययावत करणारे, विद्यार्थ्यांची आकलन क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणारे, विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्तीस प्रोत्साहन देणारे, चिकित्सेला प्राधान्य देणारे, फक्त पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रात्यक्षिकांवर जास्त भर देणारे शिक्षक  जेव्हा निर्माण होतील तेव्हा  संशोधनात्मक, कौशल्य गुणांवर आधारित, नवनवीन कृतीशील प्रयोगांवर आधारित शिक्षण पद्धती अस्तित्वात येण्यास मदत होईल ज्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि पर्यायाने देशाचे भवितव्य उज्वल होताना आपल्याला दिसेल